गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (15:12 IST)

मोदी यांच्या स्वप्नातील महाराष्ट्राला “स्वच्छता ही सेवा”पुरस्कार

स्वच्छतेत ठरले देशातील सर्वोत्कृष्ट राज्य
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला देश सुंदर आणि स्वच्छ असावा हे स्वप्न पहिले आहे.  यामध्ये केंद्र सरकारने या प्रयत्नांची दखल घेत  स्वच्छतेच्या बाबतीत विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राला ‘स्वच्छता ही सेवा’ या पुरस्काराने गौरविवले आहे. नवी दिल्लीत आयोजित स्वच्छ भारत दिवस विशेष समारंभात हा गौरव करण्यात आला आहे. यामध्ये  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल व नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. 

हा पूर्ण कार्यक्रम  विज्ञान भवनात गांधी जंयतीनिमित्त स्वच्छ भारत दिवस व स्वच्छ भारत अभियानाचा तिसरा वर्धापन दिन तसेच ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री उमा भारती, गृहनिर्माण व नगर विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री हरदीप सिंह पुरी, पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री श्री एस. एस. अहलुवालिया व राज्यमंत्री श्री रमेश चंदप्पा जिगाजीनागी यावेळी उपस्थित होते.