Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांची माहिती का लपवली जाते?

Last Modified मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017 (17:21 IST)

पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या लाभांची माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट नकार दिला आहे. या परदेश दौऱ्यांद्वारे होणाऱ्या लाभांची गणना केली जात नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय सूचना आयोगाला सांगितले आहे. कीर्तिवास मंडल या
RTI
कार्यकर्त्याने पंतप्रधान मोदींच्या परदेशी दौऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या लाभांची माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत मागितली होती. मात्र मंडल यांना त्याबाबत माहिती मिळाली नाही. देशाचे पंतप्रधान हे देशाचे प्रधानसेवक आहेत. त्यांनी परदेश दौऱ्यावर किती खर्च केला, त्या दौऱ्यांमधून देशाला काय मिळाले, याबाबत त्यांनी माहिती द्यायला हवी. जर माहिती लपवली जात असेल तर त्याचे कारण काय? याबाबत खुलासा व्हायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक

यांनी केली आहे.यावर अधिक वाचा :