शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 एप्रिल 2023 (13:06 IST)

Navjot Singh Sidhu : नवज्योतसिंग सिद्धू यांच्या सुरक्षेत त्रुटी,घराचा टेरिसवर संशयित आढळला

पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी दावा केला आहे की त्यांच्या पतियाळा निवासस्थानी एक संशयित व्यक्ती  घराच्या छतावर दिसला.सिद्धूने सांगितले की, तो माणूस ब्लँकेटने झाकलेला होता पण जेव्हा घरच्या मदतनीसाने अलार्म लावला तेव्हा संशयित लगेच पळून गेला. 
सिद्धूने आपल्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल सांगितले आहे की त्यांनी या प्रकरणाची माहिती पंजाब पोलीस प्रमुखांना दिली आहे. सिद्धू यांनी ट्विट केले की, "आज संध्याकाळी 7:00 च्या सुमारास एक राखाडी रंगाचा ब्लँकेट घातलेला एक अज्ञात संशयित व्यक्ती माझ्या निवासस्थानाच्या टेरेसवर आढळून आला, माझ्या घरातील नोकराने अलार्म वाजवला आणि मदतीसाठी हाक मारताच तो लगेच पळून गेला."
 
नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले, "मी पंजाब पोलिसांच्या डीजीपी (पोलीस महासंचालक) यांच्याशी बोललो आहे आणि पतियाळाच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनाही याबाबत माहिती दिली आहे. या सुरक्षेतील त्रुटी मला पंजाबसाठी आवाज उठवण्यापासून रोखणार नाही." 

या प्रकरणी पटियालाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक वरुण शर्मा सिद्धू यांच्या निवासस्थानी गेले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात असल्याचे सांगितले .
 
Edited By- Priya Dixit