शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

केरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती महिलेचे रेस्क्यू

केरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले आहेत. चारीकडे पाणी दिसत असून बचाव कार्य सुरू आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात येत आहे, या दरम्यान भारतीय नौदलाचा साहसिक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात एका गर्भवती महिलेला एअरलिफ्ट केले गेले.
 
वॉटर बॅग लीक झाल्यावर या महिलेला वाचवण्यासाठी नेव्ही हेलिकॉप्टरने तिला एअरलिफ्ट केले गेले. रेस्क्यूनंतर गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे 25 वर्षाच्या या महिलेने एका मुलाला जन्म दिला.
 
नेव्हीने ट्विटमध्ये मिशन यशस्वी झाल्याचे सांगितले तसेच एअरलिफ्ट केल्यानंतर एका डॉक्टरने महिलेची तपासणी देखील केली.