Widgets Magazine

बेजबाबदार वृत्त देणाऱ्या वाहिन्यांना राष्ट्रवादी काँग्रेस नोटीस पाठवणार - नवाब मलिक

Last Modified शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (16:41 IST)

इकबाल कासकरला खंडणी प्रकरणी अटक झाल्यानंतर काही वाहिन्यांनी जाणूनबुजून इकबाल कासकरचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांशी असल्याचे बेजबाबदार वृत्त दिले होते. असे तथ्यहीन वृत्त देणाऱ्या वाहिन्यांना राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर नोटीस पाठवणार तसेच ज्या वृत्तवाहिन्या आपली चूक लक्षात घेऊन माफी मागणार नाहीत त्यांच्याविरोधात खटला दाखल करु असा इशारा राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात सरकारला लागणाऱ्या विलंबाबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.यावर अधिक वाचा :