1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:29 IST)

भारतात सर्वाधिक लोक इंटरनेट शिवाय जगू शकत नाही

इंटरनेट शिवाय जगण्याची कल्पनाच करू न शकणाऱ्यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे.  एका सर्वेक्षणानुसार देशातील ८२ टक्के लोकांनी इंटरनेट शिवाय जगू शकत नसल्याचे म्हटले आहे. 

स्टॅस्टीस्टा या कंपनीने २३ देशातील  १८,१८० लोकांचा सर्वेक्षण केले होते. यातील फक्त १८ टक्के लोकांनी इंटरनेट शिवाय काम करू शकत असल्याचे म्हटले आहे . तर ८२ टक्के भारतीय लोकांनी इंटरनेट शिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाही, असे म्हटले आहे. 

या बाबतीत भारत पहिल्‍या तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये ७८ टक्के लोक इंटरनेट शिवाय जगू शकत नाहीत. इंग्लंड  या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. या देशात ७७ टक्के लोकांनी इंटरनेट शिवाय जगू शकत नाहीत असे म्हटले आहे.  चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर जर्मनी आणि अमेरिका आहे.  त्यानंतर रशिया, चीन आणि फ्रान्स यांचा क्रमांक लागते.  तर इटली आणि जपान १० व्या क्रमांकावर आहेत. तेथील ६२ टक्के लोक इंटरनेट शिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाहीत.