testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांच्यावर गुन्हा दाखल करा – नवाब मलिक

Last Modified बुधवार, 27 डिसेंबर 2017 (16:33 IST)

डॉक्टरांनी रजा घ्यायची असेल तर नक्षलवादी बनून घ्या, आम्ही त्यांना गोळया घालू असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूरमध्ये केले असून त्यांच्या या वक्तव्यानंतर हंसराज अहिर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक

यांनी केली आहे.

लोकशाही पध्दतीने हे मंत्री झाले आहेत परंतु त्यांची मानसिकता ही हुकुमशाही पध्दतीची असून त्यांनी केलेले वक्तव्य ही उघड धमकी देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे भारतीय दंड विधान कलम ५०६ अंतर्गत हा गुन्हा असून प्रशासनाची जबाबदारी आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच अहिर यांना अटक करावी अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.यावर अधिक वाचा :