testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पाकड्यांचा मस्तवालपणा सामनामधून शिवसेनेची जोरदार टीका

shivsena
Last Modified बुधवार, 27 डिसेंबर 2017 (15:38 IST)
पाकने कुलभूषण यांच्या परिवाराला दिलेल्या वाईट वागणुकीचा जोरदार समाचार सामना ने घेतला आहे. यामध्ये सामनातील अग्रलेखाने पाकवर जोरदार टीका करण्यात आली आहे. पाक माजला आहे त्याला मानवता माहित नाही का असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे. या ५० वर्षात पाक माजला असून आपण अजूनही शांततेच्या गप्पा करतो आहोत असे या लेखात म्हटले आहे.
सामनातील अग्रलेख पुढील प्रमाणे :
हिंदुस्थानी पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची त्यांच्या वाढदिवशी ‘सरप्राइज’भेट घेऊन त्यांच्या आईसाठी शाल भेट द्यायची आणि त्यांनी कुलभूषण व त्याची आई तसेच पत्नीला समोरासमोर घेऊनही ना भेटू द्यायचे ना बोलू द्यायचे. पाकिस्तानच्या अशा मस्तवालपणाचा मागील ५०-६० वर्षांत डोंगर झाला आहे आणि आम्ही तो डोंगर पोखरून ‘परस्पर सामंजस्या’चा ‘उंदीर’बाहेर काढण्यातच मग्न आहोत. कुलभूषण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीबाबत पाकड्यांनी जी खालची पातळी गाठली त्याला फक्त निषेधाचे कागदी बाण हे उत्तर होऊ शकत नाही. पाकिस्तानचा फणा ठेचणे हेच त्या देशाबाबत आपण आजवर दाखविलेल्या राजकीय नेभळटपणाचे ‘प्रायश्चित्त’ठरेल!
कुत्र्याचे शेपूट आणि पाकड्यांचे शेपूट सारखेच आहे. कितीही नळीत घातले तरी ते वाकडेच राहते. कितीही साखरपेरणी केली तरी त्यांच्या वागण्या-बोलण्यातील हिंदुस्थानद्वेष आणि विखार कमी होत नाही. आतादेखील हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानी तुरुंगात असलेले कुलभूषण जाधव आणि त्यांची आई व पत्नी यांच्या भेटीप्रसंगी पाकिस्तानने आपले खायचे दात दाखवलेच. खरे तर जेमतेम ४० मिनिटांचा वेळ या भेटीसाठी देऊन पाकड्यांनी त्यांचा नापाक इरादा स्पष्ट केलाच होता. मात्र समोरासमोर येऊनही त्यांना थेट बोलता येणार नाही, एका आईला तिच्या मुलाला कुशीत घेता येणार नाही किंवा पती-पत्नीला किमान हस्तांदोलनही करता येणार नाही याची काळजी पाकिस्तानने घेतली. बंद काचेची ‘दीवार’पाकड्यांनी त्यांच्यात आणून ठेवली. एवढेच नव्हे तर कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला बांगड्या, टिकली, मंगळसूत्र हे सर्वच काढून ठेवायला लावले. कपडे बदलण्यास भाग पाडले. त्यांना मराठी भाषेत बोलण्यासदेखील मज्जाव करण्यात आला. हा पाहुण्यांच्या आदरातिथ्याचा कोणता प्रकार म्हणायचा? ‘अतिथी देवो भव’ही आपली संस्कृती नाही हेच यानिमित्ताने पाकिस्तानने दाखवून दिले. वास्तविक या भेटीवरून आपण कसे मानवतावादाचे पुजारी आहोत.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

कांदा भाव पडला असून, फक्त एक रुपया किलो

national news
कांदा पिकाची देशातील राजधानी असलेल्या नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालीये.. ...

कोळ्यांनी विणलं 310 मीटर लांबीचं जाळं

national news
घरात आणि रानावनात तुम्ही कोळ्याचं जाळं पाहिलं असेल. हे जाळं असं किती मोठं असू शकतं? 6 ...

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर ...

national news
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन ...

फसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र

national news
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसले ...

यूजर्स वापरतात हे अॅप्स

national news
प्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल? असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ...

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर ...

national news
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन ...

फसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र

national news
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसले ...

यूजर्स वापरतात हे अॅप्स

national news
प्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल? असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ...

प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? त्याबाबत सगळी बोंबच : शिवसेना ...

national news
ज्या उच्च दर्जाची भाषा आणि अपेक्षा नागरी विमान वाहतुकीकडून केली जाते त्या अपेक्षेला छेद ...

महाराष्ट्रातील शिक्षकांना गुजराती चॅनेलवरून धडे

national news
महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले आता मराठी शिक्षकांनाही ...