testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हार्बर लाईन बंद रेल्वे ठप्प प्रवासी वर्गाचे हाल

mumbai trains
Last Modified मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (16:34 IST)
मुंबई येथील जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या
हार्बर मार्गावरील बेलापूर ते पनवेल वाहतूक गेल्या काही तासांपासून बंद पडली आहे. यामध्ये दोन्हीही बाजूची वाहतूक बंद असून त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. लोकलची
ओव्हरहेड वायर तुटल्याने ही वाहतूक बंद झाली आहे. तर दुसरीकडे या तुटलेल्या तारेचे काम पूर्ण न झाल्यामुळे
प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यात विशेष म्हणजे
उरण-बेलापूर या लोकलच्या मार्गाच्या कामासाठी मागील चार दिवसांपासून हार्बर मार्गावर मेगाब्लॉक होता. या वेळी सुद्धा प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला आहे. मेगाब्लॉक संपला तरी प्रवाशांचे हाल मात्र अजून संपलेले नाहीत. यामध्ये रोज प्रवास करणारी लोकल आता
बेलापूर स्थानकात थांबून आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात अजूनही काम झालेलं नाही.


यावर अधिक वाचा :