सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 डिसेंबर 2017 (15:08 IST)

दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या शोपियान सेक्टरमध्ये मंगळवारी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे.  यावेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. सुरुवातीला भारतीय जवानांना सर्व दहशतवादी ठार झाले, असे वाटले होते. मात्र, अन्य दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेत असतानाच तिसऱ्या दहशतवाद्याने पुन्हा एकदा भारतीय सैन्याच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली. त्यामुळे आता या ठिकाणी पुन्हा एकदा चकमकीला सुरुवात झाल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी दिली.