testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भिवंडीत भाजपा कार्यकर्ते आणि शिवसैनिक भिडले मोठा राडा

shivsena bjp
भिवंडी येथील कालेर भागात मतदानाच्या वेळी शिवसेना आणि भाजपचे
कार्यकर्ते समोर आले होते . दोन्ही बाजूनं जोरदार बाचाबाची झाली. त्यातूनच पुढे वाद वाढत गेल्यानं हाणामारी झाली आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणूकांसाठी आज मतदानाला सुरू आहे.जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.काल शहापूर तालुक्यात पैसे वाटत असल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्याचा प्रकार घडला होता त्यामुळे आज हा वाद उफाळून आला आहे. मात्र पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण मिळवले असून सुरक्षा वाढवली आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या 53 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 106 गणांसाठी हे मतदान होत असून यामध्ये
शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांत हे मतदान समवेश आहे.


यावर अधिक वाचा :