कार्यकर्त्यांची हत्या होणे हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे – नवाब मलिक

Last Modified सोमवार, 30 एप्रिल 2018 (17:13 IST)

- राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह...

अहमदनगरमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची हत्या होत आहे. मुख्यमंत्र्यांना राज्याची कायदा सुव्यवस्था हाताळता येत नाही. हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष
नवाब मलिक

यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल
जामखेड
येथे कडकडीत बंद पाळण्यात आला त्यावर मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन युवक कार्यकर्त्यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघाची ही अवस्था आहे तर संपूर्ण जिल्ह्याची काय अवस्था असेल असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष
चंद्रशेखर घुले पाटील
यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांचा पोलिस यंत्रणेवर वचक राहिला नाही. त्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही घुले यांनी केली.

दरम्यान काल सकाळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर पोलिस अधिक्षक कार्यालय येथे पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन जामखेड येथील हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे उपस्थित होते.यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपूर्णपणे ...

यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा
यंदा कोरोना संक्रमणामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपूर्णपणे वेगळ्या ...

हाथरस पुन्हा एकदा हादरले : 4 वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन ...

हाथरस पुन्हा एकदा हादरले : 4 वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन मुलांनी केला बलात्कार
हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली ...

कोरोना लसीचे मोफत देण्याच्या आश्वासनावरुन शिवसेनेची भाजपवर ...

कोरोना लसीचे मोफत देण्याच्या आश्वासनावरुन शिवसेनेची भाजपवर टीका
“बिहारला ‘लस’ मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत. कोरोना लसीचा ...

जेईई मुख्य परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये; ...

जेईई मुख्य परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये; शिक्षणमंत्र्यांची घोषणा
इंजिनिअरिंगच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांकाच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम ...

कोरोनावरील लस मोफत देणार; तमिळनाडू सरकार

कोरोनावरील लस मोफत देणार; तमिळनाडू सरकार
कोरोनावरील लस येण्याचे संकेत मिळताच विविध राज्यांमधील सरकारांकडून मोफत लसीकरणाबाबतच्या ...