शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

एका आघाडीच्या हिंदी चॅनलवर एका दिवसाची बंदी

पठाणकोट हल्ल्यावेळी नियम मोडून कव्हरेज केल्याप्रकरणी एनडीटीव्ही इंडिया या हिंदी न्यूज चॅनलवर केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयानं कारवाई केली आहे. दहशतवादी हल्ला सुरु असताना नियमाचा भंग करुन कव्हरेज केल्याप्रकरणी संपूर्ण एक दिवस चॅनल बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रायलाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, एनडीटीव्ही इंडियाला 9 नोव्हेंबरला दुपारी एकपासून ते 10 नोव्हेंबर दुपारी एक वाजेपर्यंत  प्रसारण बंद ठेवावं लागणार आहे. दरम्यान, एखाद्या न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात येत आहे.
 
पठाणकोट हल्ल्यावेळी एनडीटीव्ही इंडियानं एअरबेसवर असणाऱ्या हत्यारांची माहिती दिली होती. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीच्या मते, ‘अशाप्रकारची माहिती सार्वजनिकरित्या जाहीर करणं हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं घातक आहे. तसेच त्यावेळी दहशतवाद्यांना सूचना देणारे या माहितीचा वापर करु शकत होते’ असे या समितीचे म्हणणे आहे.