मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शाळांमध्ये पहिला तास सेल्फीचा

येत्या जानेवारी महिन्यापासून शाळांमधला दर सोमवारचा पहिला तास हा सेल्फीचा ठरणार आहे. कारण पटपडताळणीसाठी शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. देशातली 18 टक्के मुले पटावर नोंद असूनही प्रत्यक्षात शाळेत येत नाहीत. त्यामुळे हजेरीची सातत्याने पडताळणी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

याआधी बायोमेट्रिकचा पर्याय स्वीकारण्यात आला. पण आता त्यापेक्षा सेल्फीचा पर्याय सोपा असल्याने तसे आदेश देण्यात आले आहेत. यात शिक्षकांनी सोमवारच्या सकाळी प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांचा गट तयार करुन सेल्फी काढून शासनाच्या ‘सरल’ या प्रणालीवर अपलोड करावा लागणार आहे.