शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (17:17 IST)

NEET PG परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा नकार

NEET PG परीक्षेवर आज सुनावणी होती. नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत खंडपीठाने परीक्षेच्या स्थगितीवर नकार दिला आहे. 

ते म्हणाले, आम्ही नवीन शैक्षणिक धोरण बनवू शकत नाही. आम्ही पुन्हा शेड्युल करणार नाही. असं केल्यानं 2 लाख विद्यार्थी आणि 4 लाख पालकांना याचा फटका बसणार आहे. केवळ 5 याचिकाकर्त्यांच्या सांगण्यावरून 2 लाख विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात घालू शकत नाही. या याचिकांच्या मागे कोण आहे हे आम्हाला माहित नाही मात्र आम्ही नीटची परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार करत नाही. 

याचिकाकर्त्यांच्या दावा आहे की परीक्षेला बसलेल्या अनेक उमेदवारांना अशा शहरांमध्ये परीक्षा केंद्रे देण्यात आली आहे जिथे त्यांना पोहोचणे अवघड आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या शहरांची माहिती 31 जुलै रोजी देण्यात आली होती. आणि परीक्षा केंद्राची माहिती 8 ऑगस्ट रोजी देण्यात आली असून परीक्षा 11 ऑगस्ट रोजी आहे.
एवढ्या कमी वेळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे अवघड आहे. या साठी 11 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. अशी याचिका देण्यात आली होती.न्यायालयाने याचिका फेटाळून लावली असून परीक्षा पुढे ढकलली जाणार नसल्याचं म्हटलं आहे. नीट पीजी परीक्षा रविवार 11 ऑगस्ट रोजी दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. 
Edited by - Priya Dixit