1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 25 सप्टेंबर 2018 (11:51 IST)

गुजरातचा व्यापारी 5 हजार कोटी घेऊन पळाला

nitin sandesara
'सम्राट' विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी हजारो कोटी रुपये घेऊन परदेशात पळालेले असतानाच 5 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी परदेशात पळाला आहे. नितीन संदेसरा असे पळालेल्या व्यापार्‍याचे नाव असून तो नायजेरियात पळाला असल्याची माहिती समोर येत आहे.
 
गुजरातमधील स्टर्लिंग बायोटेक कंपनीचा मालक नितीन संदेसरा, त्याचा भाऊ चेतन संदेसरा, भावजयी दीप्तीबेन संदेसरा आणि कुटुंबातील अन्य सदस्य नायजेरियात लपल्याची माहिती आहे. 
 
भारत आणि नायजेरिया या दोन देशांत प्रत्यार्पण करार नसल्याने नितीन संदेसराला भारतात परत आणणे कठीण आहे.