Widgets Magazine
Widgets Magazine

रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आधार नंबरची गरज नाही

मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (09:32 IST)

रेल्वे तिकीट बुकिंग करताना, आधार नंबर गरजेचा नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना, याबाबतची माहिती दिली.

गोहेन म्हणाले की, रेल्वे तिकीट बुकींगसाठी 12 अंकी अधार नंबर बंधनकारक करण्याचा कोणताही प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाच्या विचाराधीन नाही. पण तरीही या वर्षीच्या जानेवारीपासून आधारच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावरील सवलत मिळवण्यासाठी आधार कार्डची पडताळणी गरजेची असल्याचंही स्पष्ट केलं. तसेच दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना गोहेन म्हणाले की, पॅरिस करारान्वये, भारतातील प्रदूषणसंदर्भातील उत्सर्जन कमी करण्यासाठी लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे. त्यात उत्सर्जन कमी करण्यासाठी रेल्वे विभागाचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मुंबई : बेस्ट कर्मचारी संपावर

मुंबईकरांच्या वाहतुकीचे प्रमुख साधन असलेल्या बेस्टची वाहतूक बंद आहे. मुंबई ...

news

कन्हैय्या कुमारकडून पंतप्रधान मोदींना टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिटलर बनण्याचं स्वप्न पाहू नये. तुम्ही ना हिटलर आहात, ना ...

news

व्यंकय्या नायडू बनले उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत ‘रालोआ’चे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी ...

news

भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्त्याला अटक

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर शुक्रवारी गुजरातमध्ये दगडफेक करण्यात आली. ...

Widgets Magazine