शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (12:54 IST)

ओबीसी आरक्षण लढ्याला प्रचंड यश;मेडिकल प्रवेशात ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचे पंतप्रधानांचे आदेश

देशातल्या ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला प्रचंड यश मिळाले आहे.देशातील वैद्यकीय प्रवेशात ओबीसींना 27 टक्के आरक्षण लागू करण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.आता वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी मोकळा झाला आहे.
 
सूत्रांच्या माहितीनुसार हा निर्णय उत्तरप्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचे सांगण्यात येत आहे.ऑल इंडिया कोटाच्या अंतर्गत ओबीसींना मेडिकल क्षेत्रात एमबीबीएससह पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण देण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या लोकांसाठी आरक्षणावर काम करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले.या बैठकीत विधी आणि सामाजिक न्याय विभागाची काही मंडळी देखील होती.तसेच ही बैठक केंद्रीय शिक्षण आणि आरोग्य मंत्रालयाची बैठक होती.
 
आर्थिक दृष्टया सर्व मागासांना आरक्षण देण्याचा प्रयत्न पंतप्रधानांचा आहे.त्यामुळे मोदींनी आर्थिकदृष्टया मागासांनाही मेडिकल मध्ये प्रवेश देण्याचे आदेश दिले आहे.महाराष्ट्रात सुमारे 700 ते 800 विद्यार्थ्यांना फायदा होणार असे वृत्त समजले  आहे.