1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: भुवनेश्वर , मंगळवार, 23 जून 2020 (16:31 IST)

ओडिशाला पुन्हा वादळाचा धोका

पश्चिम बंगालच्या  उपसागरात ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीला पुन्हा वादळाचा धोका निर्माण झाला आहे. ओडिशाला लागून असलेल्या भागात वातावरणात वादळी स्थिती निर्माण होत असल्यामुळे ओडिशाला अ‍ॅलर्ट जारी केला गेला आहे. हवामान खात्याचे अधिकारी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. हवामान विभागाने ओडिशाला हाय अ‍ॅलर्ट जारी केला.
 
समुद्रात 0.9 ते  6 किमी दरम्यान दक्षिणेच्या बाजूला वादळी  स्थिती निर्माण होत आहे. पुढच्या तीन दिवसात ते उत्तर पश्चिमेच्या दिशेने पुढे सरकेल,असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशाला गेल्या महिन्यात अम्फान  महाचक्रीवादळाचा तडाखा बसला. यानंतर अरबी समुद्रातील निसर्ग वादळामुळे महाराष्ट्राच्या  कोकण किनारपट्टीला फटका बसला. आता या वादळाचा इशारा  हवामान विभागाने दिला आहे.