शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 मार्च 2018 (11:17 IST)

ओमर अब्दुल्ला यांनी पहिल्या पत्नीकडे मागितला घटस्फोट

जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहिल्या पत्नीकडे घटस्फोट मागितला आहे. त्यामुळे अब्दुल्लांनी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने ओमर यांची विभक्त पत्नी पायल यांना दिले आहेत.  अब्दुल्ला यांना पुन्हा लगीनगाठ बांधण्याची इच्छा आहे. 'आमचा तुटलेला संसार कधीच जुळवता येऊ शकत नाही' असं ओमर अब्दुल्लांनी घटस्फोटाच्या अर्जात म्हटलं होतं.

न्यायाधीश सिद्धार्थ मृदुल आणि दीपा शर्मा यांच्या खंडपीठाने पायल यांना नोटीस पाठवली आहे. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपूर्वी उत्तर देण्यास कोर्टाने सांगितलं आहे. पायल यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

1 सप्टेंबर 1994 रोजी ओमर अब्दुल्ला आणि पायल यांचं लग्न झालं होतं. ओमर अब्दुल्ला आणि पायल यांच्या नात्यात 2007 मध्ये कटुता आली होती.  2009 पासून दोघं विभक्त राहायला लागले. ओमर आणि पायल यांना दोन मुलं असून ती आईसोबत राहतात.