शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाबामुळे चंदु चव्हाणची जिवंत सुटका: भामरे

चंदुच्या सुटकेसाठी संरक्षण विभागाने पाकिस्तानकडे सतत पाठपुरावा करून आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाब निर्माण केल्याने जवान चंदु चव्हाणची जीवंत सुटका करणे शक्य झाले असल्याची माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री ना.डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर बैठका घेवून पाकिस्तानावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परराष्ट्रीयमंत्री सुषमा स्वराज, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंग, मोहन परळीकर यांनी डीजीएमओ स्तरावर बैठका घेवून पकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच पाकिस्तानने लष्कराने त्याला वाघा बॉर्डरवर सोडून त्यांची सुटका केली असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले. आता चंदु लष्कराचा जवान असल्याने चौकशी व कागदोपत्री पुर्तता झाल्यानंतरच तो गावाकडे परतणार असल्याचेही डॉ.भामरे यांनी सांगितले.