गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2019 (09:31 IST)

नरेंद्र मोदींचे भाषण पाकिस्थानला समजेना अभिनंदन शब्दाचा पाक ने घेतला धसका

आपल्या हिंदी भाषेत अभिनंदन या शब्दाचा अर्थ शुभेच्छा देणे होतो. तर अनेकांचे नाव देखील अभिनंदन होते. पूर्ण जगाने पाहिले की आपले विंग कमांडर अभिनंदन पाक मधून देशाने दबाव टाकत परत आणले होते. मात्र मोदी पुन्हा सत्तेवर आले आणि पाकिस्थानला धडकी भरली आहे. नरेंद्र मोदी यांनी विजयी भाषणात पूर्ण देशाचे अभिनंदन केले सोबत खासदार आणि सर्व सरकारी यंत्रणेला त्यांनी धन्यवाद दिले आणि अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या 352 नवनिर्वाचित खासदारांचं अभिनंदन केलं. खासदार आणि पक्षाच्या विजयाबाबत मोदींनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छा देताना मोदींनी ‘अभिनंदन’ या शब्दाचा प्रयोग केला. मात्र, पाकिस्तानी मीडियातील न्यूज अँकर ‘अभिनंदन’ला विंग कमांडर अभिनंदन समजला. मग काय त्याने नरेंद्र मोदी यांचे भाषण दाखवत टीका करायला सुरुवात केली. हा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला मग सोशल मिडीयाने या अँकरला जोरदार धारेवर धरले आणि अभिनंदन या शब्दाचा अर्थ समजाऊन सांगितला आहे. ‘अभिनंदन’ या शब्दाला विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्याशी जोडलं. यानंतर सोशल मीडियावर हा पाकिस्तानी अँकर मोठ्या प्रमाणात ट्रोल होतो आहे. त्याची ही छोटीशी चूक त्याला भारी पडली आहे. ट्वीटरवर अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर काही या पाकिस्तानी अँकरची खिल्ली उडवली आहे.