मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बदलत्या वातावरणाचा फटका बसला मंदिरातील परंपरेला

ओदिशामधल्या केंद्रपाडा गावातील पंचबाराही देवीच्या मंदिरातील परंपरेला बदलत्या वातावरणाचा फटका बसला आहे. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे किनाऱ्यावर असलेल्या मंदिराला धोका निर्माण झालाय. त्यामुळे सुमारे ४०० वर्षांची प्रथा मोडीत काढून केवळ मंदिर वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी पहिल्यांदाच गाभाऱ्यात पुरुषांना प्रवेश दिला आहे.
 
या मंदिरात दलित कुटुंबातील स्थानिक मच्छिमार महिलांनाच प्रवेश दिला जातो. या महिला पूर्वापार देवीची पूजा करत आहेत. पण वाढत्या समुद्र पातळीमुळे या मंदिराला धोका निर्माण झालाय म्हणूनच गावकऱ्यांनी मंदिरातील देवीची मूर्ती किनाऱ्यापासून काही किलोमीटर दूर असणाऱ्या मंदिरात नेल्या आहेत. मूर्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी पुरुषांची मदत महिलांनी घेतली. किनाऱ्यापासून पंचबाराही देवीचं मंदिर पाच किलोमीटर लांब होतं पण आता पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे धोका निर्माण झाला असल्यानं नवीन ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं आहे.