Widgets Magazine
Widgets Magazine

काश्मीर : जमावाकडून पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण करून हत्या

शुक्रवार, 23 जून 2017 (11:37 IST)

ammed

जम्मू-काश्मीरमध्ये जमावानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. मोहम्मद आयुब पंडित असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. ते नौहट्टा परिसरातील मशिदीबाहेर सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात होते.

काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना आणि दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रमजानमधील नमाज पठण असल्यानं खबरदारी म्हणून ठिकठिकाणच्या मशिदींबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. काश्मीरमध्ये सर्व मुस्लिम बांधव शब-ए-कद्रचा उत्सव साजरा करत आहेत. त्यासाठी सर्व लोक रात्रभर जागून मशिदी आणि दर्ग्यांमध्ये नमाजासाठी येतात. नौहट्टामधील मशिदीबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त होता. पोलीस उपअधीक्षक मोहम्मद अयुब पंडितही तैनात होते. ते मशिदीचा फोटो काढत असल्याचा जमावाचा गैरसमज झाला. काही वेळ गोंधळ उडाला. पोलीस अधिकाऱ्यानं हवेत गोळीबार केला. त्यात ३ लोक जखमी झाले. त्यानंतर जमावाने पोलीस उपअधीक्षक पंडित यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना बेदम मारहाण केली. तसंच दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

लॅरीसा यांनी संसदमध्ये केले बाळाला स्तनपान

कॅनबेरा संसदेमध्ये लॅरीसा वॉटर्स यांनी संसद सुरू असताना आपल्या बाळाला स्तनपान दिलं. संसद ...

news

‘बॅट’ च्या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद

पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद ...

news

श्रीपूजक ठाणेकर यांना चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच मारहाण

अंबाबाई मंदीराचे श्रीपूजक आणि नगरसेवक अजित ठाणेकर यांना गुरुवारी पुजारी हटाओ मोहिमेच्या ...

news

अफगाणिस्तान : बॉंम्ब हल्ल्यात 20 ठार तर 50 जखमी

दक्षिण अफगाणिस्तानमधील बॅंकेजवळ झालेल्या बॉंम्ब हल्ल्यात 20 लोक मृत्यूमुखी तर 50 जण जखमी ...

Widgets Magazine