गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मोर सेक्स करत नाही, म्हणून राष्ट्रीय पक्षी

जयपूर- राजस्थान उच्च न्यायालयाचे जस्टिस महेश चंद्र शर्मा यांनी मीडियाशी बोलताना म्हटले की आम्ही मोर हा राष्ट्रीय पक्षी घोषित केला कारण मोर सेक्स करत नाही. मोर आजीवन ब्रह्मचारी राहतो. त्याच्या डोळ्यातून पडणारे अश्रू जेव्हा लांडोर टिपते तेव्हा ती गर्भवती होते. मोर कधीच लांडोरसोबत सेक्स करत नाही.
त्यांनी म्हटले की या कारणामुळेच कृष्णाने मोर पंख लावले. साधू-संतदेखील मोर पीस वापरतात, मंदिरातही मोर पंख लावण्यात येतं. याच प्रकारे गायीत एवढेच गुण आहे म्हणून तिलाही राष्ट्रीय पशू घोषित केले पाहिजे.
 
उल्लेखनीय आहे की त्यांनी एका निर्णयात गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे आणि गोवध करणार्‍यांना आजीवन तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा कायदा असावा असे म्हटले होते. त्यांच्या हा निर्णय देशभरात चर्चेचा विषय बनला आहे.