गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (12:54 IST)

आता पेट्रोल पंपावरून काढा पैसे

नोटाबंदीनंतर देशभरात निर्माण झालेल्या चलनकल्लोळावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. सर्वसामान्यांना आता पेट्रोल पंपावरही पैसे काढणे शक्य होणार असून तुर्तास एसबीआयच्या पीओएस मशिन असलेल्या पेट्रोलपंपावर या सुविधेचा लाभ घेता येईल. पहिल्या टप्प्यात देशातील अडीच हजार पेट्रोल पंपावर पैसे काढणे शक्य होणार आहे. पेट्रोल पंपावर दोन हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येतील.
 
कोणत्या पेट्रोल पंपवर आणि कसे काढता येणार पैसे:
पेट्रोल पंपवर 2000 पर्यंत रक्कम काढता येणार आहे. आरबीआय आणि एसबीआय संयुक्तपणे ही मोहीम राबविणार आहे. ज्या पेट्रोल पंपावर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या पीओएस (कार्ड स्वाईप मशीन) आहेत तिथेच ही सुविधा असणार आहे. सुरुवातीला 2500 पेट्रोल पंपावर पैसे काढता येणार आहे.
 
आपलं एटीएम कार्ड स्वाईप केल्यानंतर पेट्रोल पंपकडून  तुम्हाला दोन हजारापर्यंतची रक्कम मिळू शकते.
यानंतर ही सुविधा आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बँकांची पीओएस असलेल्या पंपावरही ही सुविधा सुरु होणार आहे.
 
रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियानं ही सुविधा सुरु केली आहे. त्याचबरोबर 24 नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपावर 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळं एटीएम बाहेरच्या रांगा काही प्रमाणात कमी होतील.