शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 19 जून 2024 (13:33 IST)

ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅंपसचे पीएम मोदींनी केले उदघाटन

Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बिहारमधील राजगीरमध्ये ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅंपसचे उदघाटन केले. सकाळी नालंदा विद्यापीठ मध्ये मोदी पोहचले. सर्वात पहिले विश्वविद्यालयाच्या जुन्या धरोहर ला जवळून पाहिले. यानंतर मोदी नवीन कॅंपस जवळ गेले, जिथे त्यांनी बौधी वृक्ष लावले. मग नवीन कॅंपसचे उदघाटन केले. 
 
वर्ष 2016 मध्ये नालंदाच्या खंडरला सयुंक्त राष्ट्र विरासत स्थळ घोषित केले होते. यानंतर विश्वविद्यालयाचे निर्माण कार्य 2017 मध्ये सुरु झाले. विद्यापीठाचे नवीन कॅंपस नालंदाच्या प्राचीन खंडर जवळ बनवले आहे. या नवीन कॅंपसची स्थापना नालंदा विश्वविद्यालय अधिनियम, 2010 च्या माध्यमातून केली गेली आहे. या अधिनियम मध्ये स्थापना करण्यासाठी 2007 मध्ये फिलीपींस मध्ये आयोजित दुसरे पूर्वी एशिया शिखर संम्मेलन मध्ये घेतल्या गेलेल्या निर्णयाला लागून प्रावधान करण्यात आला होता. 
 
नालंदा विद्यापीठामध्ये दोन ऍकेडमिक ब्लॉक आहे. ज्यामध्ये 40 क्लासरूम आहे. इथे एकूण 1900 विद्यार्थी बसू शकतील एवढी व्यवस्था आहे. तसेच विद्यापीठामध्ये दोन ऑडिटोरयम आहे ज्यामध्ये 300 सीट आहे. याशिवाय इंटरनॅशनल सेंटर आणि  एम्फीथिएटर बनवले आहे. जिथे 2000 लोक बसू शकतात. तसेच विद्यार्थ्यांसाठी फॅकल्टी क्लब आणि स्पोर्ट्स काँप्लेक्स सोबत अनेक सुविधा आहे. नालंदा विद्यापीठाचे कॅंपस 'NET ZERO' कॅंपस आहे. याचा अर्थ आहे की, इथे पर्यावरण अनुकूल एक्टिविटी आणि शिक्षण होते. 
 
 
तसेच या विद्यापीठाचा इतिहास खूप जुना आहे कमीतकमी 1600 वर्ष पहिले नालंदा विद्यापीठाची स्थापना पाचव्या शतकात झाली होती. जेव्हा देशामध्ये नालंदा विद्यापीठ बनवण्यात आले. तेव्हा जगभरातील विद्यार्थी इथे शिक्षण घ्यायला यायचे. तसेच काही इतिहासकारांच्या मते 12 व्या शतकात आक्रमणकारींनी या विद्यापीठाला नष्ट केले होते.  

Edited By- Dhanashri Naik