शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (22:26 IST)

पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक, संरक्षण क्षेत्राशी संबंधित आव्हानांवर चर्चा झाली

Prime Minister Modi's high-level meeting discussed issues related to the defense sector marathi news national
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील ड्रोन हल्ल्याबाबत त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेतली.या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशिवाय एनएसए अजित डोभालदेखील उपस्थित होते.
 
माहितीनुसार, बैठकीत संरक्षण क्षेत्रातील भविष्यातील आव्हानांवर चर्चा करण्यात आली.सुरक्षा दलांना आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज करण्याबाबतही चर्चा झाली. याशिवाय सुरक्षे संदर्भातील इतर विषयांवर चर्चा झाली.
 
उल्लेखनीय आहे की रविवारी जम्मू हवाई दल स्टेशनवर दोन कमी-तीव्रतेचे स्फोट झाले.यामध्ये दोन ड्रोन वापरण्यात आले. हल्ल्यासाठी प्रथमच दहशतवाद्यांनी ड्रोनचा वापर केला होता. यामागे पाकिस्तानचे षडयंत्र सांगण्यात आले.या स्फोटात एअरबेस इमारतीच्या छताचे थोडेसे नुकसान झाले. या स्फोटासाठी आयईडीचा वापर करण्यात आला.