testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राधे माँ ढसाढसा रडू लागली

राध माँ आणि वादविवाद हे तसे नवे नाहीत. बर्‍याचदा आपल्या वादांमुळे राधे माँ चर्चेत येते. सध्या ही राधे माँ अशीच चर्चेत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राधे माँने आपल्या खासगी आयुष्याबाबत प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी महिला पत्रकाराने मिनी स्कर्ट बाबत प्रश्न विचारता असता राधे माँला रडू आवरणे कठीण झाले.
मुलाखततीत राधे माँने आपल्या आयुष्यातील अनेक घटनांना थेट उत्तरे दिली. पत्रकराने राधे माँला मिनी स्कर्ट आणि शॉर्ट कपडे वापरण्याबाबत प्रश्न विचारला असता राधे माँला रडू आवरणे कठीण झाले. राधे माँ थेट कॅमर्‍यासमोरच ढसाढस रडू लागली. आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या ढोंगी बाबांच्या यादीत समावेश केल्याबद्दल तसेच व्यवसाय, चोरी करणे अशा आरोपांवर ही राधे माँने थेट भाष्य केले.
राधे माँ म्हणाली, मी बिनधास्त आहे. जगाला वाटते म्हणून मी माझी जीवनशैली बदलू शकत नाही. पुढे बोलताना राधे माँने म्हटले की माझे वयाच्या 17 व्या वर्षीच लग्न झाले. लग्नानंतर चारच वर्षात माझे पती मला ‍आणि दोन मुलांना सोडून विदेशात गेले. अशा वेळी मी चुकीच्या रस्त्याने जाण्यापेक्षा ईश्वराला शरण गेले.

मुलाखतीदरम्यान राधे माँने सांगितले की मी छोटे कपडे वापरते. पण केवळ आपल्या बेडरूममध्ये. मी बेडरूमबाहेर कधीच शार्ट कपडे वापरले नाहीत. राधे माँने उलट पत्रकाराला विचारले तुम्ही नाही का वापरत तुमच्या बेडरूममध्ये शॉर्ट कपडे? मी छोटे कपडे वापरते कारण मला पूर्ण कपड्यात झोपच नाही येत.


यावर अधिक वाचा :