गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (16:41 IST)

ताजमहल परिसरात शिव चालिसा वाचण्याचा प्रयत्न

ताजमहल परिसरात काही हिंदुत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शिव चालिसा वाचण्याचा प्रयत्न केला.अलिगढ आणि हाथरस या ठिकाणांहून आलेल्या सहा-सात तरुणांनी सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर जोर-जोरात शिव चालिसा वाचण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिथे हजर असलेल्या सीआयएसएफ जवान आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (एएसआय) कर्मचाऱ्यांनी यावर आक्षेप नोंदवला.ताजमहलात नमाज होऊ शकतं, मग आम्ही पूजा का नाही करु शकत?, असा सवाल या  तरुणांनी विचारला .

त्यानंतर सीआयएसएफच्या जवानांनी तरुणांना पकडून गेस्ट रुममध्ये नेले. तिथे तरुणांनी लिखित माफीनामा दिला. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.हाथरसमधील राष्ट्रीय स्वाभिमान दलाचा कार्यकर्ता दीपक शर्माने सांगितले, “ते लोक सोमवारी तेजोमहालयात शिव चालिसा वाचण्यासाठी गेले होते. शिव चालिसा वाचल्यानंतर ते उपवास सोडतात. त्यांना रोखलं गेलं, हे चूक आहे.”हिंदू युवा वाहिनीचे अलिगढचे शहराध्यक्ष भारत गोस्वामी यांनी म्हटलं की , “तेजोमहालयात पूजा करणाऱ्यांना रोखलं जात आहे, हे बरोबर नाही.”