Widgets Magazine
Widgets Magazine

काश्मीर वादात तिस-या पक्षकाराचा हस्तक्षेप नको : राहुल गांधी

शनिवार, 22 जुलै 2017 (09:41 IST)

काश्मीर म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच काश्मीर, असं म्हणत राहुल गांधी यांनी चीन आणि पाकिस्तानच्या सुरू असलेल्या गुप्त चर्चांवर टीका केलीय. काश्मीरच्या वादात कोणत्याही तिस-या पक्षकारानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असंही राहुल गांधींनी चीनला ठणकावून सांगितलंय.

राहुल गांधी यांनी या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केलीय. मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे काश्मीरमध्ये हिंसाचार वाढला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर चीन आणि पाकिस्तानमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे. मात्र माझ्या दृष्टिकोनातून हा भारताचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे त्यात त्रयस्थ देशानं पडण्याची गरज नाही, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी काश्मीरमध्ये उफाळून आलेल्या हिंसाचाराला भाजपा आणि एनडीए सरकारला जबाबदार धरलं आहे. नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या चुकीच्या धोरणांमुळेच काश्मीर धुमसतंय, असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

भारतीय रेल्वे कॅटरिंग सर्व्हिस खाण्यायोग्य नाही

रेल्वे स्टेशनांवर खाण्या-पिण्याचे जे पदार्थ बनवण्यात येतात, ते खाण्यायोग्य नाहीत. ट्रेन ...

news

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘प्रधानमंत्री व्यय वंदना योजना’

केंद्र सरकार ६० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ...

news

इस्त्रोची 29 नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून मोठी कमाई

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या अँट्रीक्सने 14 देशांच्या 29 ...

news

बागेत सेक्स करणार्‍या कपल्सचे हेलिकॉप्टरमधून केले चित्रीकरण

गार्डनमध्ये किंवा इतर ठिकाणी प्रेम करत असलेल्या जोडप्यांचे नकळत चित्रीकरण करण्यात आल्याचे ...

Widgets Magazine