testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मी पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास तयार : राहुल गांधी

Last Modified मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (11:48 IST)

पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास तयार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याची तयारी राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच दर्शवली आहे. याआधी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र काँग्रेसने राहुल यांच्या नावाची घोषणा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून केली नव्हती. याविषयी राहुल गांधींनीदेखील कोणतेही भाष्य केले नव्हते. मात्र अमेरिकेत बोलताना त्यांनी प्रथमच पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास तयार असल्याचे म्हटले.

ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील बर्कलेमध्ये बोलत होते.यावर अधिक वाचा :