Widgets Magazine

राहुल गांधी झाले ट्रोल

राजा राममोहन राय यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेल्या
ट्विटमुळे ट्विटरक-यांनी राहुल गांधींना अक्षरशः धारेवर धरलं आहे.

यात राजा राममोहन राय जे बंगालच्या सुधारणेचे प्रणेते आणि स्त्रियांच्या अधिकारांसाठी झगडणारे समाज सुधारक होते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. काँग्रेसनं ट्विटर अकाऊंटवरून त्यांचा फोटोही टाकला होता. फोटोत राजा राममोहन राय यांच्या जन्मदिवसाच्या तारखेच्या ऐवजी पुण्यतिथीची तारीख आणि पुण्यतिथीच्या तारखेला जन्मदिवसाची तारीख टाकण्यात आली होती. काँग्रेसनं दोन्ही तारखा चुकवल्या होत्या. त्यामुळे ट्विटरकर काँग्रेस व पर्यायानं राहुल गांधींवर तुटून पडले.

त्यानंतर काँग्रेसला स्वतःच्या चुकीची उपरती झाली. दुसरं एक ट्विट करत काँग्रेसनं या चुकीबद्दल क्षमाही मागितली. राजा राममोहन राय यांच्यासारखाच आमचा डिझायनरही काळाच्या पुढे चालतोय, असं म्हणत एक स्मायलीही टाकलं.


यावर अधिक वाचा :