सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 4 जून 2023 (17:17 IST)

राजस्थान :4 मुलांना ड्रममध्ये बंद करून मुलांना मारून आईची गळफास घेऊन आत्महत्या

suicide
राजस्थानमधील बारमेरमध्ये एका महिलेने आपल्या चार मुलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 28 वर्षीय महिलेने तिच्या चार मुलांना लोखंडी ड्रममध्ये बंद केले, त्या दरम्यान मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. यानंतर महिलेनेही गळफास घेऊन आत्महत्या केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री बारमेरजवळील बनियावास गावात ही घटना घडली. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.
 
पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या तीन मुली आणि एका मुलाला धान्याच्या डब्यात टाकून वरचे झाकण बंद केले. त्यामुळे मुलांचा गुदमरून मृत्यू झाला.  8 वर्षांची मुलगी भावना, 5 वर्षांचा मुलगा विक्रम, 3 वर्षांची मुलगी विमला आणि 2 वर्षाची मुलगी मनीषा यांचा गुदमरून मृत्यू झाला. यानंतर विवाहितेने राहत्या घरात केलेल्या कच्च्या शेडमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शेजारच्या लोकांना महिला कुठेच दिसली नाही म्हणून त्यांनी तिचा शोध घेतल्यावर ती लटकलेल्या अवस्थेत आढळली. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. घटनेच्या वेळी मृत महिलेचा पती घरी नव्हता, असे पोलिसांनी सांगितले. तो मजूर असून घटनेच्या वेळी कामावर गेला होता.
 
पती-पत्नीमध्ये काही कारणावरून भांडण झाले असून, महिलेने मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याची भीती व्यक्त होत आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, पीडितांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना माहिती देण्यात आली असून औपचारिक तक्रारीची प्रतीक्षा आहे. यासोबतच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून महिलेच्या पतीचीही चौकशी करण्यात येणार आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासोबतच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 
 
Edited by - Priya Dixit