testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राहुल गांधी वारंवार बुलेटप्रूफ गाडी घेणे टाळतात : राजनाथ सिंह

Last Modified मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (16:38 IST)

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर

उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींनाच घेरले.
राहुल गांधी वारंवार बुलेटप्रूफ गाडी घेणे टाळतात. शिवाय परदेश दौऱ्यावर जाताना विशेष संरक्षण कवचही (एसपीजी) घेत नाहीत, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
संसदेच्या कायद्यानुसार राहुल गांधींना एसपीजी संरक्षण देण्यात आलेले
आहे. त्यांच्या गुजरात दौऱ्याची पोलिसांनी आणि प्रशासनाने संपूर्ण तयारी केली होती. राज्य गुप्तचर यंत्रणेच्या सुचनेनुसार सुरक्षा रक्षक, पेट्रोलिंग, जॅमर्स आणि बुलेटप्रूफ कारची व्यवस्था तैनात करण्यात आली होती. राहुल गांधींचा दौरा असलेल्या धनेरा या ठिकाणी दोन पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी, 6 पोलीस उपअधीक्षक आणि मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

हेलिपॅडवर उतरुन राहुल गांधी बुलेटप्रूफ कारकडे जात होते. त्याचवेळी त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकाने (पीएस) त्यांना नॉन बुलेटप्रूफ कारने जाण्याचा सल्ला दिला. राहुल गांधींनी एसपीजी अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि पीएसच्या म्हणण्याप्रमाणे ते साध्या कारने गेले. पुढील प्रवासातही त्यांनी प्रोटोकॉल मोडले आणि अनेक अशा ठिकाणी थांबले, जी ठिकाणे दौऱ्यात नव्हती, असंही राजनाथ सिंह म्हणाले.यावर अधिक वाचा :