testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राजू शेट्टी यांनी अमित शाह यांचे निमंत्रण नाकारले

raju shetti
मुंबई| Last Modified शुक्रवार, 16 जून 2017 (11:30 IST)
भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे आजपासून तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान भाजपच्या मित्रपक्षांशी चर्चा करण्याचे त्यांनी ठरवले होते. मात्र, खासदार राजू शेट्टी यांनी चर्चेचे निमंत्रण नाकारले आहे.
राज्यात भाजप घटकपक्षांच्या मदतीने सत्तेत आहे. या घटकपक्षांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनाही मुख्य पक्ष आहे. त्यामुळे अमित शाह यांच्यासोबत चर्चेसाठी भाजपकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांना फोन करुन निमंत्रण दिले. मात्र, खासदार राजू शेट्टी यांनी नकार कळवला.

खासदार राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या आंदोलनासाठी दिल्लीत आहेत. दिल्लीत देशभरातल्या शेतकरी नेत्यांना एकत्र करुन शेट्टी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. शिवाय, महाराष्ट्रातल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी हे गैरहजर राहणार असल्याचीही चर्चा आहे.


यावर अधिक वाचा :