राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Last Modified बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (10:21 IST)
राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी मतदान होणार असून निवडणूक आयोगाने
राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील ७ जागांसह देशभरातील एकूण ५५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

देशातील १७ राज्यातून राज्यसभेवर निवडून आलेल्या ५५ सदस्यांची मुदत एप्रिल महिन्यात संपत आहे. यात महाराष्ट्रातील ७ सदस्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सदस्यांची मुदत २ एप्रिल २०२० रोजी संपुष्टात येत आहे. राज्यसभेसाठी खुले मतदान असल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.

विधानसभेत आघाडीचे १७० संख्याबळ
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केल्याने राजकीय समीकरण बदलले आहे. राज्यसभेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची ३७ मते आवश्यक आहेत. विधानसभेत आघाडीचे १७० तर भाजप आणि मित्र पक्षाचे ११४ असे संख्याबळ आहे. चार सदस्य तटस्थ आहेत. विधानसभेतील आघाडीचे आणि भाजपचे संख्याबळ लक्षात घेता आघाडीचे चार तर भाजपचे तीन उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. परंतु, आघाडीतील तीन पक्षात अजून जागांचे वाटप झालेले नाही. तथापि, राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एक जागा लढू शकते.
राज्यसभेतून निवृत्त होणारे सदस्य
राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवार, माजिद मेमन
काँग्रेस : हुसेन दलवाई
शिवसेना : राजकुमार धूत
भाजप : अमर साबळे
आरपीआय : रामदास आठवले
अपक्ष : संजय काकडे


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

Monsoon Update: मुसळधार पावसामुळे केरळच्या 9 जिल्ह्यात यलो ...

Monsoon Update: मुसळधार पावसामुळे केरळच्या 9 जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा
दक्षिण-पश्चिम मान्सूनने सोमवारी केरळमध्ये जोरदार दणका दिला. कोझीकोड जिल्ह्यात आज सकाळी ...

पतीला पालकांपासून विभक्त होण्यास भाग पाडणे, घटस्फोट ...

पतीला पालकांपासून विभक्त होण्यास भाग पाडणे, घटस्फोट घेण्याचा एक वैध आधार असू शकतो - केरळ उच्च न्यायालय
केरळ उच्च न्यायालयाने घटस्फोटासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने ...

दिल्लीत वयोवृद्ध डॉक्टरांनी हाताला विद्युत तारा बांधून ...

दिल्लीत वयोवृद्ध डॉक्टरांनी हाताला विद्युत तारा बांधून आत्महत्या केली
पश्चिम दिल्लीतील विकासपुरी भागात एका ज्येष्ठ डॉक्टरने अत्यंत वेदनादायक पद्धतीने आत्महत्या ...

मोदींनी पत्र लिहून देशवासियांशी संवाद साधला

मोदींनी पत्र लिहून देशवासियांशी संवाद साधला
नरेंद्र मोदी २.० चे एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशवासियांनी ...

लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णयाची शक्यता

लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णयाची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत ...