मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 14 ऑगस्ट 2022 (10:11 IST)

Rakesh JhunJhunwala: ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन

शेअर बाजारातील ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात येत आहे.  त्यांना ‘भारताचे वॉरन बफेट’ असेही म्हणतात. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. झुनझुनवाला 62 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 6.45 वाजता त्यांचे निधन झाले. झुनझुनवाला यांच्या पश्चात पत्नी रेखा झुनझुनवाला, मुलगी निष्ठा  आणि दोन मुले आर्यमन आणि आर्यवीर असा परिवार आहे. 
 
अलीकडेच विमान वाहतूक क्षेत्रात पदार्पण केलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी विविध प्रकारच्या व्यवसायात गुंतवणूक केली असून त्यांनी अलीकडेच आकासा एअरलाइन्समध्येही गुंतवणूक केली आहे. झुनझुनवाला यांचा त्यात 40टक्के हिस्सा होता. ही गुंतवणूक अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा बहुतेक विमान कंपन्या तोट्यात आहेत. आकाश एअरलाइन्सने अमेरिकन एरोस्पेस कंपनीकडून 72 बोईंग 737 MAX विमानांची खरेदी केली. राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजारातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक होते.