शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (17:34 IST)

राकेश टिकैत यांना मिळणार आंतरराष्ट्रीय सन्मान, 21 व्या शतकातील आयकॉन पुरस्कारासाठी निवड झाली

शेतकरी चळवळीचा सर्वात मोठा चेहरा म्हणून उदयास आलेल्या भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांचे नाव  लंडन च्या स्क्वेअर वॉटरमेलन कंपनीतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या '21 व्या शतकातील आयकॉन अवॉर्ड'च्या अंतिम यादीत समावेश करण्यात आले आहे. 10 डिसेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती बीकेयू उत्तर प्रदेशचे उपाध्यक्ष राजबीर सिंग यांनी दिली. 
टिकैत यांनी सांगितले की, मी आंदोलनात व्यस्त असल्याने हा पुरस्कार घेण्यासाठी लंडनला जात नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यावरच पुरस्कार स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 शेतकरी आंदोलनाच्या जवळपास वर्षभरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. मात्र, अजूनही शेतकरी आंदोलन संपलेले नाही. राकेश टिकैत आणि आंदोलक शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या 700 हून अधिक शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई आणि पिकाच्या किमान आधारभूत किंमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याची मागणी करत आहेत. 
विशेष म्हणजे केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांबाबत गतिरोध निर्माण झाला होता. कायदे रद्द करूनही, शेतकऱ्यांनी एमएसपीसारख्या अनेक मुद्द्यांवर सरकारशी  लढा जाहीर केला आहे. त्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. सरकारने आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
केंद्र सरकारने तीन नवीन कृषी कायदे पारित केले हे कायदे कृषी क्षेत्रातील एक मोठी सुधारणा म्हणून बोलली जात होती, परंतु विरोध करणार्‍या शेतकर्‍यांना भीती होती की नवीन कायद्यांमुळे MSP (एमएसपी) आणि बाजार व्यवस्था नष्ट होईल आणि ते मोठ्या कॉर्पोरेट्स वर अवलंबून होतील.या भीतीमुळे त्यांनी कायदा रद्द करण्याची मागणी केली.