testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा

बाबा राम रहीमला दोन बलात्कार प्रकरणांमध्ये प्रत्येकी 10-10 वर्षे म्हणजे एकूण 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. तर दोन्ही पीडितांना प्रत्येकी 15 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
राम रहीमला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, अशी माहिती होती. मात्र दोन बलात्कार प्रकरणांमध्ये प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली
आहे. त्यामुळे राम रहीमला एकूण 20 वर्षांची शिक्षा सीबीआयच्या न्यायालयाने सुनावली आहे.

साध्वी बलात्कार प्रकरणी 25 ऑगस्टला राम रहीमला दोषी ठरवण्यात आलं होतं. राम रहीमवर बलात्कार (कलम 376), धमकावणे (कलम 506) आणि कलम 511 अन्वये शिक्षा सुनावण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :