रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 30 जुलै 2018 (17:30 IST)

रांची : एका परिवारातील सात जणांची सामुहिक आत्महत्या

झारखंडच्या रांचीतील एका परिवारातील सात जणांनी सामुहिक आत्महत्या केली आहे. कांके प्रखंडच्या अरसंडेमध्ये ही घटना घडली आहे. मृतकांचा परिवार कर्जात डुबला होता. त्यांना दोन लहान मुल होती. यातील एका बाळाचे वय ४ते ५ वर्षांचे तर दुसरा साधारण एक वर्षांचा होता. प्रथमदर्शनी पाहता हे आत्महत्येच प्रकरण दिसत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूमागचे कारण समजणार आहे. एका व्यक्तीचा मृतदेह फाशीच्या रशीला लटकलेला दिसला तर बाकीचे मृतदेह अंथरूणात होते. भागलपुरमध्ये राहणाऱ्या दीपक झा आणि त्याचा परिवार कर्जात डुबला होता. कित्येक महिने त्याने भाडे दिले नसल्याचे घरमालकाने सांगितले. 
 
दीपकच्या मुलीला नेणारी स्कूल बस घराजवळ आल्यावर आत्महत्येचा उलघडा झाल्याचे घरमालकाने सांगितले. स्कूल वाहन चालकाने हॉर्न वाजवला तरीही घरातून कोणी बाहेर आलं नाही. त्यानंतर घरमालकाने आपल्या मुलाला आतमध्ये पाठवलं. त्यानंतर लहान मुलाने आत जे पाहिल ते बाहेर येऊन सांगितलं. खिडकीतून लोकांनी पाहिलं तेव्हा सर्व सुन्न झाले.