1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जळगाव महानगरपालिकेत भरती निघाली

jobs
जळगाव महानगरपालिकेत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेली पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. आणि हो अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. Jalgaon Mahanagarpalika Bharti
 
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस- 20
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस – MNC कौन्सिल नोंदणी वैध असणे आवश्यक आहे
2) वैद्यकीय अधिकारी – बीएएमएस- 20
शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे
 
वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : 150/- रुपये [मागासवर्गीय -100/- रुपये]
इतका मिळेल पगार
40,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव पिन – 425001.
 
 
Edited by: Ratnadeep Ranshoor