रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :नवी दिल्ली , गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (16:25 IST)

RILचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बद्रीनाथ आणि केदारनाथ धाम येथे केली प्रार्थना

mukesh ambani
देशाच्या समृद्धीची इच्छा
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि एमडी मुकेश अंबानी यांनी बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरात प्रार्थना केली. दरवर्षी प्रमाणे भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी भगवान बद्री विशालच्या विशेष दर्शनासाठी बद्रीनाथ धाम येथे पोहोचले. त्यांनी भगवान बद्री विशालची विशेष प्रार्थना केली आणि देशाच्या समृद्धीसाठी कामना केली. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनीही केदारनाथ धाममध्ये जाऊन पूजा केली.
mukesh ambani

केदारनाथला पोहोचल्यावर मंदिर समितीने त्यांचे स्वागत केले. यावेळी भगवान बद्री विशाल यांच्या श्रृंगारमध्ये वापरण्यात आलेली तुळशीची माळही मुकेश अंबानी यांना भेट म्हणून देण्यात आली. बद्रीनाथ मंदिराच्या सभामंडपात पोहोचल्यानंतर मुकेश अंबानी यांनी सामान्य भक्ताप्रमाणे भगवान बद्री विशालचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या गर्भगृहात काही काळ ध्यान केले.

Edited by : Smita Joshi