शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: कोयंबटूर , गुरूवार, 17 ऑगस्ट 2017 (10:09 IST)

सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी चालवले नद्यांना पुनर्जीवित करण्याचे राष्ट्रीय नदी अभियान - भरताचा कल्याण

हा काही विरोध नाही आहे न ही कुठले आंदोलन आहे. हे आमच्या वाळत असलेल्या नद्यांबद्दल जागरूकता दाखवणारे अभियान आहे. प्रत्येक तो व्यक्ती जो पाण्याचा वापर करतो, त्याला नदी अभियानात सामील व्हायला पाहिजे.

ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी भारतीय नद्यांना पुनर्जीवित करण्याची तत्काल आवश्यकता आहे या बद्दल लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी एक राष्ट्रव्यापी जन अभियान सुरू करताना ही बाब म्हटली. जन-जनाला जागरूक करण्यासाठी सद्गुरू कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत स्वत: गाडी चालवत 16 राज्यांहून जाणार आहे. या अभियानात समाजाच्या प्रत्येक तबक्याला सामील करण्यासाठी 21 मोठे कार्यक्रम आणि बरेच लहान लहान कार्यक्रम होतील, जे ऑनलाईन पण असतील आणि ऑफ-लाइन पण. 

अभियानाच्या समर्थनासाठी 13 मुख्यमंत्री नदी अभियानाच्या कार्यक्रमांमध्ये सामील होतील. या रॅलीला केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायु परिवर्तन मंत्री, माननीय डॉ. हर्षवर्धन 3 सप्टेंबरला कोयंबटूरमधून हिरवा कंदील दाखवून रवाना करतील. रॅलीचे समापण 2 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत राजनीती, नीती, व्यवसाय, फिल्म आणि खेळ जगतच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या उपस्थिती होणार आहे. 

ईशा फाउंडेशनच्या वतीने मध्यप्रदेश सरकारने इतर वस्तूंबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि वृक्षारोपणासाठी एक जन आंदोलन सुरू केले आहे ज्याने नर्मदा नदीत नवीन जीव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येईल. गोदावरी नदीच्या पुनर्जीवन आणि 50 कोटी वृक्ष लावण्यासाठी 1 जुलै 2017ला ईशा फाउंडेशनने महाराष्ट्र सरकारसोबत एका ज्ञापनावर स्वाक्षरी केल्या आहेत.

नदी अभियानात लाखो लोकांचे समर्थन मिळण्याची उमेद लावण्यात आली आहे, यात नद्यांना पुनर्जीवित करण्याची एक व्यापक नीतिला जन समर्थनाच्या प्रतीक स्वरूपात एक टोल फ्री नंबर (80009 80009) वर मिस्ड कॉल द्यायचे आहे. तरुण, पंचायत सदस्य आणि ईशा फाउंडेशनच्या स्वयंसेवकांद्वारे प्रेरित एक राष्ट्रव्यापी जागरूकता अभियान चालवण्यात येत आहे. 

नदी अभियानाला जबरदस्त प्रतिक्रिया मिळाल्या आहे, ज्यात राजनैतिक दलांपासून समाजाचे सर्व वर्ग आणि क्षेत्रांचे लोक सामील आहे. या अभियानाला 30 कार्पोरेट कंपन्यांशिवाय सीमा सुरक्षा बळ, इफ्को, आयआरसीटीसी, कर्नाटक बँक, रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया, वर्ल्ड एक्वा फाउंडेशन, मायक्रो फायनेंस असोसिएशंस, इंडिगो एयरलाइंस, डीएवी स्कूल्स, स्पीक मॅके, एडुकॉम्प सॉल्यूशंस यांचे समर्थन मिळाले आहे.

नदी अभियानाची महत्ता समजवत, सद्गुरू यांनी म्हटले, ‘फक्त एक पिढीत आमची बारहमासी नद्या मोसमी झाल्या आहेत. बर्‍याच लहान नद्या आधीच वाळलेल्या आहेत. जर या गंभीर स्थितीला पालटण्यासाठी आम्ही आता पाऊल उचलले नाही तर आम्ही पुढच्या पिढीला संघर्ष आणि कमतरतेची विरसातच देऊ शकतो.’ 

जीवनातील प्रत्येक क्षेत्राची शख्सियत - तमाम राजनैतिक दलांचे नेते, धार्मिक नेता, बॉलीवूड, कन्नड, तेलुगू, तमिळ फिल्म अभिनेता, क्रिकेटर आणि कार्पोरेट प्रमुख, सर्वांनी ट्विटरवर नदी अभियानाला समर्थन देण्याचा वादा केला आहे.

अभिनेत्री जूही चावला ने 80009 80009 वर मिस्ड कॉल देण्याची अपीलीसोबत नदी अभियानाला समर्थन देण्याचे ट्विट केले आहे. त्याशिवाय, अनुपम खेर, ऋषि कपूर, मधु, दीया मिर्जा, मनोज वाजपेयी, राकेश ओमप्रकाश मेहरा, शेखर कपूर, तनीषा मुखर्जी, शंकर महादेवन, प्रसून जोशी, तनुजा, शिखर धवन, आनंद महिंद्रा, किरन मजूमदार शॉ, मिताली राज, एक्टर राधिका, आणि मास्टर शेफ संजीव कपूर ने देखील समर्थनाची बाब म्हटली आहे.

सोशल मीडिया साईट फेसबुकवर मळ्यालम सुपरस्टार मोहनलाल ने नदी अभियानाबद्दल शाळेतील मुलांशी चर्चा करून सद्गुरु यांचा एक वीडियो दाखवला आहे आणि म्हटले आहे की ‘या व्हिडिओपासून मी फार प्रभावित झालो, ज्यात आमच्या नद्यांना पुढील 20 वर्षांतील होणार्‍या दुर्दशेबद्दल जागरूकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कन्नड फिल्म अभिनेता-अभिनेत्र्या पुनीत राजकुमार, गणेश, तमिळ अभिनेता विवेक, सुहासिनी मणिरत्नम, राधिका, पार्थिपन देखील या अभियानाच्या समर्थनास पुढे आले आहे. बायोकॉनची सीएमडी किरन मजूमदार शॉ यांनी नदी अभियानाच्या समर्थनात ट्विट केले, ‘सद्गुरू द्वारे प्रेरित एक महान नागरिक आंदोलन.’महिंद्रा ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी म्हटले की, ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत सद्गुरू. आता रीवर राफ्टिंगचे नाही, रीवर रॅलीइंगची वेळ आहे.’ 

आरएसएस प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी सद्गुरूच्या ट्विटला रिट्विट करत लिहिले,‘आम्ही सर्व या मिशनमध्ये तुमच्या सोबत आहोत.’ऑल इंडिया इमाम संगठनाचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांनी ट्विटरवर सद्गुरूसोबत आपले फोटो शेअर करत या महान उद्देश्यासाठी आपले पूर्ण समर्थन देण्याची बाब म्हटली आहे. 

नंतर सद्गुरू यांनी ट्विट केले की ‘पाण्याचा वापर करणार्‍या प्रत्येकाला या नदी अभियानात सामील व्हायला पाहिजे. चला आपण सर्व एकत्र होऊन याला  शक्य करून दाखवू. एडुकॉम्प सॉल्यूशंस, डीएवी स्कूल्स, विद्या भारती स्कूल, कॅमलिन आणि निकलेडिआन इंडियाच्या भागीदारीमुळे भारताचे किमान 100,000 शाळांमध्ये भारताच्या नद्यांना पुनर्जीवित करण्याची गरज आणि संभावित समाधानांवर रचनात्मक लेखन आणि कला स्पर्धा सुरू झाली आहे. 

या सर्व शाळांमध्ये असेंब्लीच्या वेळेस नदी स्तुती, आणि त्याच्यानंतर सद्गुरू आणि वीरेंद्र सहवागची एक अपील दाखवली जाणार आहे. शेखर कपूर, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि प्रह्लाद कक्कड़ यांच्या सहयोगाने नदी अभियान एक राष्ट्रीय शॉर्ट फिल्म कॉम्पटीशन देखील सुरू करत आहे. 9 जुलै रोजी या अभियानाच्या सुरुवातीत किमान 6000 ईशा स्वयंसेवकांसोबत सद्गुरू भारताच्या मानचित्राच्या आकारात एक विशाल ह्युमन फॉरमेशनहून समोर आले आहे.