Widgets Magazine

मुलाला दंश करणार्‍या सापावर पित्याने जाहीर केले 5000 रूपयांचे बक्षिस

snake
शहाजहानपूर- शहाजहानपूरमध्ये एका शेतकर्‍याने सापावर बक्षिस जाहीर केल्याची विचित्र घटना समोर आली आहे. बक्षिसही काही साधंसुधं नसून तब्बल पाच हजार रूपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. या सापाचा शोध घेणे हेच या शेतकर्‍याचे मुख्य लक्ष्य आहे.
सापाने गेल्या दोन वर्षात चार वेळा आपल्या मुलाला दंश केला असल्याचा दावा या शेतकर्‍याने केला असून जो कोणी सापाला पकडून आणेल त्याला पाच हजार रूपयांची रोख रक्कम दिली जाईल असे जाहीर करण्यात आले आहे. सापामुळे त्रस्त्र झालेल्या 45 वर्षीय शेतकरी सुरेंद्र कुमार यांनी आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी घराबाहेर दोन सुरक्षारक्षकही उभे केले आहेत. मुलाची सुरक्षा करणेही एकमेव जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. फक्त सुरेंद्र कुमारच नाही तर गावातील लोकांचेही म्हणणे आहे की साप सूड घेण्याच्या उद्देशाने फक्त सुरेंद्र कुमार यांच्या मुलाला वारंवार दंश करत आहे.


यावर अधिक वाचा :