Widgets Magazine
Widgets Magazine

गोहत्या बंदी कायदा देशभर लागू करावा: भागवत

गोहत्येविरोधात कायदा देशभरात लागू करण्यात यावा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. यासोबतच गोसंरक्षणासाठी केलेले कोणतेही हिंसक कृत्य गोसंरक्षणाच्या भूमिकेची बदनामी करणारे ठरेल, असेदेखील भागवत यांनी म्हटले. गोसंरक्षणाच्या भूमिकेचा पुनरूच्चार करताना कायद्याचे पालन केले जावे, असे भागवत म्हणाले.
 
मोहन भागवत यांनी गोहत्या आणि गोरक्षक यांच्याबाबत बोलताना सांगितलं की, गोहत्या विरोधात संपूर्ण देशात कायदा लागू करण्यात यावा, मात्र गोक्षणाच्या नावाखाली होणारा हिंसाचार चुकीचा असल्याचं भागवत यांनी म्हटलं आहे.
 
महावीर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालकांनी गोरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या हिंसाचाराला विरोध केला आहे. मात्र देशभरात गोहत्येविरोधाक कायदा लागू करण्यात यावा असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. गायींचं रक्षण कायद्याच्या चौकटीमध्ये झालं पाहिजे असंही भागवत म्हणाले. हिंसेमुळे गोरक्षणाच्या कामात अडथळा येत असल्याचंही भागवत यांनी म्हटलं आहे.
 
भाजपशासित अनेक राज्यांमध्ये गोहत्या बंदी लागू करण्यात आल्याचं मोहन भागवत म्हणाले. इतरही राज्यात लवकरच गोहत्या बंदी लागू केली जाईल असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

कॉल सेंटर प्रकरणाचा मास्टरमाईंडला पकडण्यात यश

मुंबईतील मीरा रोड बनावट कॉल सेंटर प्रकरणाचा मास्टरमाईंड सागर ठक्कर उर्फ शॅगी याला ठाणे ...

news

मलाला युसूफझई संयुक्त राष्ट्राची शांतिदूत

संयुक्त राष्ट्र महासचिव ऍन्टोनियो गुटेरेसने नोबल शांती पुरस्कार विजेती मलाला युसूफझई हिची ...

news

बांग्लादेश पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात ...

Widgets Magazine