Widgets Magazine

उपग्रहातील 3 घड्याळे बंद

भारतातील विविध ठिकाणांची माहिती पुरविण्याच्या उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) प्रक्षेपित करण्यात आलेल्या सातपैकी एका उपग्रहातील तीन स्वयंचलित घड्याळे बंद पडल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. भारताकडून नुकत्याच प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘आयएनआरएसएस-१ ए’ या उपग्रहात अचूक वेळ निर्धारित करण्यासाठी स्वयंचलित घड्याळांचा वापर करण्यात आला आहे. युरोपमधून खास मागवण्यात आलेल्या या घड्याळांमुळे भारतातील ठिकाणांची अचूक माहिती पुरवण्यात मदत होणार होती. या घड्याळांशिवाय ठिकाणांबद्दलची अचूक माहिती मिळवणे शक्य नाही.


यावर अधिक वाचा :