testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सेल्फीच्या नादात दोन तरुणी बुडाल्या

Last Modified शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (17:11 IST)

सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना नदीत बुडून दोन तरुणींचा मृत्यू झाला. दोन्ही तरुणी आंध्रप्रदेशच्या राहणा-या होत्या. दोन्ही मृतदेहांची ओळख पटली आहे. एका तरुणीचं नाव ज्योती (27) असून ती विशाखापट्टणमची राहणारी होती, तर दुसरी तरुणी श्रीदेवी (23) विजयनगरची रहिवासी होती.

दोन्ही तरुणी विशाखापट्टणम येथून पर्यटनासाठी आल्या होत्या. एकूण नऊ जणी पर्यटनासाठी आल्या होत्या. नागाबली येथील पुलावर या सर्वजणी फिरत होत्यात त्यानंतर काहीजणी फोटो काढण्यासाठी खाली नदीत उतरल्या. नदीतील एका दगडावर उभं
राहून फोटो काढत असताना तोल गेल्याने ज्योती आणि श्रीदेवी पाण्यात पडल्या आणि वाहून गेल्या. बचाव पथक आणि स्थानिकांच्या मदतीने दोन्ही तरुणींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं आहे.यावर अधिक वाचा :