testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Survey : गुजरातमध्ये भाजपला 118-134 जागा मिळण्याची शक्यता

bjp logo
नवी दिल्ली| Last Modified शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (11:27 IST)
येत्या 18 डिसेंबरला गुजरातची सत्ता कोण मिळवणार हे समजणार आहे. मात्र, त्याआधी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीनुसार गुजरातमध्ये कमळच फुलणार असल्याचं दिसतं आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका वृत्त वाहिनीने केलेल्या सर्व्हेनुसार गुजरातमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गुजरात निवडणुकी आधी करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार गुजरातमध्ये भाजपला 118-134 जागा मिळतील. तर काँग्रेसला 49 ते 61 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतरांना 3 जागा मिळतील. मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपला 52 टक्के, काँग्रेसला 37 टक्के आणि इतरांना 11 टक्के मतदान मिळू शकतं.

या सर्व्हेनुसार गुजरातमध्ये भाजपविरोधात कोणतीही लाट पाहायला मिळत नाही. तसेच 2012तील निवडणुकीपेक्षा भाजपच्या जागा या निवडणुकीत वाढण्याची शक्यता आहे. 2012मध्ये भाजपला 115 जागा मिळाल्या होत्या. तर आता 118 ते 134 जागा मिळण्याची शक्यता आहे.


यावर अधिक वाचा :