Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

ते सर्व सहा नगरसेवक शिवसैनिकच

Last Modified गुरूवार, 26 ऑक्टोबर 2017 (11:31 IST)

मनसेतून शिवसेनेत गेलेले सर्व सहा नगरसेवक शिवसेनेत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेत गेलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसंच सहा नगरसवेकांच्या सह्या असलेलं पत्रही प्रसिद्ध केलंय. त्यामुळं हे सहा नगरसेवक मनसेत परतणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय.

या सहा नगरसेवकांपैकी दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम आणि हर्षला मोरे हे चार नगरसेवक मनसेत परतणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र हे सर्व शिवसेनेत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय.

याआधी मनसेचे ते नगरसेवक पुन्हा मनसेत दाखल होणार असल्याचे वृत्त होते.यावर अधिक वाचा :